बेळगांवच्या बारदान असोसिएशन मार्फत महाद्वारोडच्या 12 नंबर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना टिशर्ट व ट्रॕकपँटस (स्पोर्टस्-गणवेश) वाटप. –
आज बेळगांव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महाद्वाररोड येथील असणाऱ्या सरकारी मराठी प्राथमिक 12 नंबर शाळे सर्व विद्यार्थ्यांना बेळगांवच्या बारदान असोसिएशनतर्फे शालेय स्पोर्टस्-गणवेश (टीशर्ट आणि ट्रॅकपँटस) चे वाटप करण्यात आले. शाळेतर्फे पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थीनींनी स्वागतगीत गाऊन व गुलाब पुष्प देऊन केले. दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन केल्यानंतर प्रमुख अतिथी श्री विजय भद्रा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांना मान्यवर सदस्य श्री विजय भद्रा, श्री बंडू अंगोलकर, श्री नारायण प्रधान व श्री मधु आजगावकर यांच्या हस्ते टिशर्ट व ट्रॕकपँटस् चे वितरण करण्यात आले.
मुख्याध्यापिका शोभा मॕडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मागील महिन्यातचं गुजराती नवरात्र उस्तव मंडळातर्फे मराठी 12 नंबर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले होते. त्यावेळी कबूलच केल्याप्रमाणे एका महिन्यातच सर्व बारदान असोसिएशनच्या वतीनै स्पोर्टस्-गणवेश मिळवून दिल्याबद्दल विजय भद्रा व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मराठी 12 नंबर शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित.