त्या अनगोळच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
बेळगाव : विषप्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद टिळकवाडी पोलिसांत झाली आहे. सिवाजी शेषाप्पा बजंत्री (वय ५८, रा. आंबेडकरनगर, अनगोळ) असे मृताचे नाव आहे. त्यांना दारूचे व्यसन होते. पत्नी व कुटुंबियांनी सातत्याने सांगूनही त्यांचे व्यसन कमी होत नव्हते. २७ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांनी घरातील विषारी औषध प्राशन केले. २८ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी त्यांची पत्नी मायव्वा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. टिळकवाडी पोलिसांनी नोंद करून घेतली असून निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करत आहेत.