*ग्रामपंचायत सदस्यांची स्वच्छता मोहीम तीव्र गतीने*
बेळगाव कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या आजूबाजूचा परिसर श्रावण सोमवारचे निमित्त साधून स्वच्छ करण्याची मोहीम तीव्रगतीने चालू आहे. नदीच्या परिसरात कचरा टाकू नये याबद्दल कंग्राळी खुर्द गावामध्ये जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे कंग्राळी खुर्द गावातून अति उत्तम प्रतिसाद लाभत आहे,
पण गावच्या बाहेरील शाहूनगर, सदाशिवनगर, हनुमान नगर, नेहरूनगर, सह्याद्री नगर तसेच आमच्या गावच्या पुढील गावातील ये जा करणारे लोक त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत त्यामुळे मुख्य रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाली होते. हे ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन त्वरित तो कचरा हटविला व त्या ठिकाणी पाळत ठेवून कचरा टाकणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस प्रशासनाकडे सोपविण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
तसेच पूजेचे साहित्य नदीत न टाकता ते आपल्या शेतातच टाकावे असा समज देखील यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर ,विनायक कम्मार हे उपस्थित होते.