गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारी हजेरी लावली.ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू असतानाच मुसळधार पावसाने झोडपून काढले.
काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा निर्माण झाला होता.सोमवारी दुपारी अचानक आकाश अंधारून आले आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली.खरेदीसाठी बाजारात आलेल्या लोकांना आसरा शोधण्यासाठी पळापळ करावी लागली.श्रावण सोमवार निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भक्तांना देखील पावसापासून बचाव करून घेण्यासाठी आसरा शोधावा लागला.एक तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते.