बेळगाव:पाईपलाईन रोड,अमृत मलम फॅक्टरी समोरील रस्ता संपूर्णपणे खराब झाला असून याकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
पावसामुळे हा रस्ता संपूर्णपणे खचला आहे.या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मंगळवारी या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा या ठिकाणी पलटी झाली. प्रशासनाने याकडे लवकर लक्ष देऊन हा रस्ता बनवून द्यावा आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी स्थानिक रहिवाशांच्याकडून मागणी होत आहे.
अशी दुर्घटना घडून एखाद्याचा जीव घेण्यास त्याला कोण जबाबदार ? असा सवाल येथील नागरिकांतून विचारण्यात येत आहे. अशी घटना घडल्यास यापुढे नागरिका तीव्र आंदोलन हाती घेणार असल्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हे काहीच कळत नाही.
त्यामुळे एक खड्डा चुकवता चुकवता वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाते आणि दुर्घटना घडते. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन येथील रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी वारंवार करून सुद्धा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. जर रस्ता वेळेत दुरुस्त झाला नाही तर रस्त्यावर नागरिक व उतरतील असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.