अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळ मारुती हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत अभिषेक सेवा करण्यात आली.त्या नंतर सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले.सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्या नंतर महापूजा आणि महाआरती करण्यात आली.सकाळपासून भक्तांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.भक्तांना संपूर्ण दिवसभर तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले.दुपारी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. पुजारी बंधूंनी अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.