समर्थ नगर येथे ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याच सांगता : टाळ-मृदंग,कीर्तन भजन, प्रवचन,आणि अभंगाच्या तालात कालाकीर्तन करून महाप्रसादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याची झाली सांगता
बेळगाव : समर्थ नगर, बेळगाव येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप श्री राजु गुंडू जायनाचे (धामणे) यांच्या अधिष्ठान खाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला चालना देण्यात आले होते आणि या पारायण ची सांगता सोहळा गुरुवारी दिनांक 18/4/24 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाली यावेळी ग्रामीण चे माजी आमदार श्री संजय पाटील यांनी बेळगाव चे माळकरी तसेच आजूबाजूच्या परिसरात कुठेही पारायण सोहळा असेल तर या पारायण सोहळ्याला उपस्थित असणारे जेष्ठ माळकरी श्री शंकर बाबू गेंजी वय वर्ष 101 राहणार भांदुर गल्ली बेळगाव यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आला तसेच त्यानंतर कालाकीर्तन, महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने माळकरी ठालकरी,सेवेकरी तसेच आजुबाजुचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते