पुणे बंगलोर महामार्गावर हलगा येथे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला.ट्रकच्या जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टरचे टायर आणि भाग दूरवर उडून पडले.
ट्रकने दिलेल्या धडकेमुळे ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्गावरून सर्व्हिस रोडवर जावून खाली पडला तर कोथिंबीर भरलेली ट्रॉली तीनशे फूट फरफटत गेली.ट्रॅक्टर चालक पुणे बंगलोर महामार्गावरून कोथिंबीर विक्री करण्यासाठी भाजी मार्केटला निघाला होता.त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.अपघातात ट्रॅक्टरचे तुकडे झाले आणि टायर निखळून दूरवर फेकला गेला.
अपघाताची भीषणता इतकी होती की ट्रॅक्टर चालकाच्या मृतदेहाचे देखील चार तुकडे झाले होते.अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला हटवली.
मल्लापा पारीस दंडकल्लणवर (४१) असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.