This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे गेल्या तीन दिवसांपासून कलमेश्वर गल्ली बेळगुंदी येथील रहिवासी गिल्बर्ट डायस वय 53 हे बेपत्ता झाले होते तर आज त्यांचा मृतदेह येथील गावातील मारिया भवन नर्सरी शाळेच्या मागील बाजूस आढळल्याने खळबळ माजली आहे.

येथील उसाच्या शेतातील खुल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे . गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सदर इसम बेपत्ता झाले होते यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध मोहीम राबवली त्यानंतर त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही त्यामुळे त्यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलची मदत घेतली.

त्यानंतर फेसबुक फ्रेंड सर्कलच्या मदतीने सर्वत्र शोध मोहीम राबविण्यात आले यावेळी गावामध्ये देखील सर्वत्र शोध मोहीम राबविण्यात आली बेळगुंदी येथील शेतामधील विहिरी रेल्वे स्टेशन बस थांबे प्रार्थनास्थळ या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते कुठेही सापडले नाही.

तसेच आज सकाळी पुन्हा नव्या दमाने सर्वांनी शोधमोहीम हाती घेतली. यावेळी बेळगुंदी येथील मारिया भवन नर्सरी शाळेच्या मागे त्यांची एक स्लीपर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विहिरीत तू काम पाहिले असता त्यांचा मृतदेह या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.

यावेळी सर्वांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याकरिता अग्निशमनला माहिती दिली यावेळी अग्निशमक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now