*के एल ई स्कुल ऑफ म्युझिकच्या समर कॅम्प समारोप समारंभ* 15 th April 2024 at KLE convention centre belgaum
के एल ई संगीत महाविद्यालयात सुमारे 20 दिवस मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते (26th March to 15th April 2024). उन्हाळी शिबिरात सुमारे 95 मुलांनी सहभाग घेतला होता. हे शिबीर KLE ‘s Chancellor Dr Prabhakar kore यांनी मुलाना मोफत (free) करून दिले. या शिबिरात मुलांना हार्मोनियम, तबला, आणि संगीत शिकवण्यात आले. काल झालेल्या समारोप कार्यक्रमात सर्व मुलांनी मोठ्या उत्साहात रंगमंचावर आपली कला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.. ५ मुलांनी तबल्यावर एकत्र तबला वादन केले. बासरी प्रकारातील राग भूप सादर केला. ४ मुलानी संवादीनी वर राग शिवरंजीनी सुंदर प्रस्तुत केला. सुमारे 95 मुलांनी स्वर्गीय पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ एकाच आवाजात मधुर गायन केले, तसेच हिंदी , मराठी आणि कनडा गाणी अतिशय सुरेख पद्धतीने सादर केली.
प्रमुख पाहुणे म्हणून के एल ई स्कुल आफ म्युझीकचे cordinator डॉ.राजेंद्र भांडणकर, संगीत महाविद्यालयाचे प्राचार्या श्री राजाराम अंबरडेकर आदी उपस्थित होते. कॅसिओ साथी श्री यादवेंद्र पुजारी, तबलासाथी श्री राहुल मांडोलकर, श्री जितेंद्र साब्बणावर यांनी केली. हे शिबीर डाँ सुनीता पाटील, डॉ दुर्गा नाडकर्णी, संगीता कुलकर्णी, भक्ती अंबरडेकर यांच्या नेत्रुवा खाली पार पडले.