This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानात , डॉ बाबा साहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीत ही जयंती साजरी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली .

यावेळी वरिष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले यांनी शांततेत आणि अर्थापूर्ण रित्या तसेच आचार संहितेचे उल्लंघन न करता , मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी पुढे ते म्हणाले दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता , बेळगावच्या अशोक सर्कल येथून , वीरज्योतीची मिरवणूक सुरु होईल . त्यानंतर कसाई गल्ली ,चव्हाट गल्ली , संगोळी रायन्ना सर्कलमार्गे , चन्नम्मा सर्कल येथून , डॉ . बाबासाहेब ही मिरवणूक पोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनेजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी वीरज्योतीचे स्वागत करतील .

त्यानंतर पुन्हा ही ज्योत काली आमराई , कंग्राळगल्लीमार्गे , छत्रपती संभाजी चौकात दुपारी १२ वाजता पोचेल आणि त्या ठिकाणी , सरकारी कार्यक्रमानुसार मिरवणुकीला सुरुवात होईल . मिरवणूक आंबेडकर उद्यानात पोचल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महादेव तळवार, निंगाप्पा कांबळे गणेश शिग्ननावर, चंद्रकांत कोलकर,सुनील कोळकर, कल्लाप्पा मेल्लांनावर, यल्लाप्पा कोलकार, जीवन कुरणे यावेळी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now