This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अधिकाऱ्यांनी खाऊ कट्ट्याला भेट देऊन येथील दुकानदारांची चौकशी आणि कागदपत्रांची केली तपासणी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खाऊ कट्ट्याच्या गाळेधारकांमध्ये सध्या खळबळ माजली आहे कारण आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खाऊ कट्ट्याला भेट देऊन येथील दुकानदारांची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

बसवेश्वर सर्कल जवळ असलेला खाऊ कट्टा आणि नाल्याच्या बांधकामांमध्ये झालेला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात झालेला हे व्यवहार यासंदर्भात आज बेंगलोर दक्षिणचे मुख्य अभियंता दुर्गाप्पा के यांच्या वक्तृत्वाखाली वैशिष्ट्य अधिकाऱ्यांच्या पथकाने खाऊ कट्ट्याला भेट दिली दुकानदारांकडून कागदपत्रांची तपासणी केली.

यावेळी राजू टोपणनावर आणि सुजित मिळवून यांनी खाऊ कट्टा संदर्भात अधिकाऱ्यांजवळ करार मांडले आणि कशाप्रकारे या ठिकाणी गैव्यवहार केला जात आहे या बाबत पितळ उघडे पाडले.

खाऊ कट्टा येथील दुकानांचे वाटप फक्त भाजपकर्त्यांना करण्यात आले आहे अशी तक्रार येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रकार कडून या ठिकाणी चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला त्यानुसार आज खाऊ कट्टा येथे महिला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अभियंता दुर्गाप्पा के म्हणाले की खाऊ कट्टा संदर्भातील तक्रारी व आरोपांच्या चौकशी संदर्भात सरकारने आमचेही पथक या ठिकाणी धाडले आहे आम्ही सकाळपासून आमच्या कामाला लागलो असून खाऊ कट्ट्याची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात आली आहे या ठिकाणच्या दुकान गाड्यांचे वाटप व्यवस्थित झाले आहे की नाही खाऊ कट्टा नाल्यावर बांधण्यात आला आहे का? आदी बाबी संदर्भात चौकशी करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले आहे त्यानुसार आम्ही या ठिकाणी चौकशी करत आहोत असे सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now