खानापूर: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कारवार लोकसभा मतदार संघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हि मागणी करण्यात आली आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील खानापूर, हलियाळ, जोयडा व कारवार भागात मराठा समाज व मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.तसेच मराठी भाषेतून माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून ददिल्यास मराठी भाषिकांची सोय होइल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच कोंकनी भाषिक देखिल अधिक संख्येने आहेत या सर्वांच्या सोयीसाठी निवडणूक प्रक्रियेवेळी बॅलेट पेपरवर फक्त कन्नड व इंग्रजीतून नावे न देता मराठी भाषेतूनही नावे द्यावीत अशी मागणी केली आहे .
यावेळी खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, मुकुंद पाटील, अभिजित सरदेसाई, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.