सीमा भागातील मराठा समाज आणि मराठी भाषकांवर होणारा अन्यायाविरुद्ध सर्व मराठ्यांना मराठी भाषिकांना एकत्रित करण्याकरिता तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बेळगाव येणार आहेत.
बेळगाव येथे त्यांची मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. आज सकाळी जालना येथील अंतरवाली सराटी मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि याविषयी सविस्तर चर्चा केली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना बेळगाव आतील मराठ्यांना एकत्रित आणण्याकरिता आमंत्रण देण्यात आले असून ते बेळगावला येणार असल्याचा दौरा निश्चित झाला आहे अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली आहे
बेळगावातील मराठी माणसांवर होत असलेला अन्याय त्यांच्यासमोर मांडला असता ममनोज जरांगे पाटील यांनी आपण बेळगावला येणार असून सर्व मराठा बांधवांना एकत्रित करणार अशी ग्वाही दिली आहे तसेच या अन्यायविरुद्ध आपण पंतप्रधानांकडे मागणी मांडून आंदोलनाच्या माध्यमातून दाद मागणार असल्याचे देखील आश्वासन दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर,अमर येळूरकर,मनोहर संताजी यांच्यासह शिष्टमंडळाच्या सदस्यांनी बेळगावला येण्याकरिता आमंत्रण दिले आहे.