बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज शहरांमध्ये शक्ती प्रदर्शन करून मिरवणूक काढली. यावेळी या शक्ती प्रदर्शनात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, खासदार मंगला अंगडी, कर्नाटक राज्याचे भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके आमदार अभय पाटील माजी आमदार संजय पाटील या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते.
प्रारंभी राम नवमी निमित्त रामदेव गल्ली येथील राम मंदिरामध्ये रामाची पूजा करून या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली .त्यानंतर खडे बाजार शनिवार खुट काकतीवेस रोड कित्तूर चन्नम्मा सर्कल जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की कर्नाटकामध्ये डबल इंजिन सरकार आपल्याला आणायचे आहे आपकी बार मोदी सरकार 400 पार करायचा आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आहे त्यामुळे जगदीश हेक्टर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावे अशी विनंती त्यांनी शक्ती प्रदर्शनात केली.त्यानंतर जगदीश शेट्टर यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे सादर केला.