This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नगरसेवक अभिजित जवळकरना अटक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगरसेवक अभिजित जवळकरना अटक

बेळगाव :इमारतीवर मोबाईल टॉवर बसविण्याच्या भांडणानंतर रविवारी (दि. २६) नगरसेवक अभिजित जवळकर यांनाही अटक झाली. त्यांच्यावर जबरी चोरीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. केली. न्यायालयासमोर हजर करून त्यांची कारागृहात रवानगी भाग्यनगरमधील अपार्टमेंटवर मोबाईल टॉवर बसविण्याच्या वादातून घडलेल्या या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे.

नगरसेवक जवळकर व रमेश पाटील हे दोघेजण भाग्यनगर येथे राहतात. पाटील हे त्यांच्या घरावर अटक टॉवर उभारणार होते. याला नगरसेवक जवळकर यांचा विरोध असून सहा महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. गुरुवारी या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादावादी झाली. सर्व दोघांनीही एकमेकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खेचले. त्यामुळे, पोलिसांनी दोघांकडून तक्रारी घेत जबरी चोरीचे कलम घातले आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रमेश यांना अटक केली. रविवारी नगरसेवक जवळकर यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले.न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.

नगरसेवक जवळकर यांना केल्याची बातमी नगरसेवकांमध्ये पसरली. त्यांना ताब्यात घेऊन टिळकवाडीचे पोलिस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी गेल्याचे कळताच नगरसेवक तिकडे जमले. परंतु, तेथून आरोग्य तपासणी करुन बराच वेळ पोलिस त्यांना दुसरीकडे घेऊन गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास जवळकर यांना हिंडलगा कारागृहात नेऊन सोडले. एका नगरसेवकावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने अन्य नगरसेवकांतून नाराजी व्यक्त होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now