*बेळगाव जिल्हा शिक्षण विभाग आणि प्रशिक्षण संस्था मन्नुर बेळगाव आणि शिक्षण विभागाच्या वतीने डायटचे प्राचार्य डॉ. एस.डी. गांजी व सौ.कुसुम एस. गांजी यांच्या 37 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती सोहळा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन*
*बेळगाव जिल्हा शिक्षण विभाग आणि प्रशिक्षण संस्था (डायट) मन्नुर बेळगाव आणि शिक्षण विभागाच्या वतीने “डायटचे प्राचार्य डॉ. एस.डी. गांजी आणि त्यांच्या पत्नी सौ कुसूमा एस. गांजी” यांच्या 37 वर्षाच्या प्रधिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त गौरव-सत्कार सोहळा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी सकाळी अकरा वाजता डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरच्या सभागृहात नुकताच मोठ्या थाटात कार्यक्रम पार पडला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे नूतन प्राचार्य डॉ. बी. एस. मायाचारी उपस्थित होते.*
*प्रमुख वक्ते म्हणून धारवाड येथील शिक्षण विभागाचे सिस्लेप डायरेक्टर डॉ. बी.के.एस. वर्धन यांचे “”आधुनिक शिक्षणाचा प्रवाह व व्यवस्थापन आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका- कार्यतत्परता”” तसेच दुसरे प्रमुख वक्ते म्हणून धारवाड येथील शिक्षण विभागाचे निवृत जॉईंट डायरेक्टर डॉ. गजानन मन्नीकेरी यांचे “”आजचे वास्तविक शिक्षण – राष्ट्रीयता आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका व जबाबदारी””* या विषयांच्यावर व्याख्यानाचे आयोजन व सेवानिवृत्ती सोहळा यशस्वी केला.
*व्यासपीठावरती धारवाड चे निवृत्त जॉईंट डायरेक्टर जी.आर. केंचरेड्डी व श्री माचकनुर, बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी , कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रधान कार्यदर्शी रामू गुगवाड, पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक कवी प्रा. निलेश शिंदे , बीईओ एम. एन. दंड्डीन, लीलावती हिरेमठ, बसवराज मिलानट्टी, आर. पी. जुट्टन्नावर, प्रा. बसवराज कुसगल, प्रा. दिलीप काळे, प्रा. आर. के. अंजनेय, आर. एस. भंडारी व्यासपीठावरती उपस्थित होते.*
*”” सत्कारमूर्ती डायटचे मावळते प्राचार्य एस.डी. गांजी आणि त्यांच्या पत्नी सौ. कुसुमा एस. गांजी””* यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव-सत्कार बेळगांव, धारवाड, कारवार, बागलकोट जिल्ह्यातील विविध संघटना, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष सन्मान व गौरव केला; त्यानंतर अनेक मान्यवरांनी विचार मांडले.
*यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. शुभा कुलकर्णी व विद्यार्थ्यांयांच्या स्वागतगीत व इशस्तवनाने करण्यात आले. तसेच पर्यावरणाचा संदेश दिला; रोपट्याला पाणी घालून जल संवर्धनाचा संदेश प्रारंभी देण्यात आला. याप्रसंगी प्रा. यु.डी. हुनकुपी, प्रा. आर. एस. भंडारी, प्रा. प्रा. आर. एन. जवळेकर, प्रा. डी.पी. काळे, पी. ए. कोळेकर, आर. एस. भोसले, दिपक सातवडेकर, उपस्थित होते.*
*यावेळी स्वागत प्रा. आर . के अंजनेय यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. शरीफ नदाफ यांनी केले. परिचय प्रा. एम. एफ. पाटील व प्रा. भारती दासोग यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. पी. आर. पाटील व प्रा. मंगल कुरबु यांनी केले तर आभार प्रा. एन. एस. नावी यांनी मानले.*
_________________________
भाषण – 1
*धारवाड येथील शिक्षण विभागाचे सिस्लेप जॉईन्ट डायरेक्टर डॉ. के.बी.एस. वर्धन*
प्रमुख वक्ते म्हणून *धारवाड येथील शिक्षण विभागाचे सिस्लेप जॉईन्ट डायरेक्टर डॉ. के.बी.एस. वर्धन* यांनी *आधुनिक शिक्षणाचा प्रवाह शिक्षण व्यवस्थापन आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका* या विषयावर व्याख्यानात शिक्षक घडणारा आणि घडविणारा
शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात. विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो. असे प्रतिपादन केले.
_________________________
भाषण – 2
*निवृत्त जॉईन्ट डायरेक्टर डॉ. गजानन मन्नीकेरी*
प्रमुख वक्ते म्हणून धारवाड येथील शिक्षण विभागाचे *निवृत्त जॉईन्ट डायरेक्टर डॉ. गजानन मन्नीकेरी* यांनी *आजचे शिक्षण आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका- जबाबदारी* याविषयावर व्याख्यानात ते बोलत होते;शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते. शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो.
_________________________
भाषण – 3
**प्राचार्य डॉ. एस.डी. गांजी*
*प्राचार्य डॉ. एस.डी. गांजी सत्काराला उत्तर देताना म्हणाले; शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 37 वर्षात शिक्षण सेवेच्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य घडले आहे. न थकता , न कंटाळता , घरदार आणि कुटुंब सोडून अविरत कार्य केले. माझ्या आयुष्यात अतिशय प्रामाणिक आणि निःस्वार्थ कार्य माझ्याकडुन घडले आहे; अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवता घडवता असंख्य शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे जीवन यशस्वी केले आहे. केंव्हाही 24 तास शासनाचे कार्य यशस्वी करून सिद्ध ही केले आहे. काम हीच पूजा याचा सार्थ त्यांच्या जीवनात आनंदानी कार्य केले आहे. माझ्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रात माझ्याकडुन 97 टक्के काम प्रामाणिक केले आहे; मात्र 2 ते 3 टक्के इतकेच माझ्याकडुन काम झाले आहे की नाही हे सांगता येत नाही. सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावरील शेवटच्या भाषणात ते असा आपल्या कार्यावरचा विश्वास आजच्या भावी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना ते अतिशय भावूक होऊन त्यांनी समाज व देशाच्या सर्वागीण उन्नतीसाठी कार्य केल्याचे दाखले देत सांगितले. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःच्या मनात ठरविले पाहिजे आणि ते मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न, कार्यातील सातत्य, कोणतेही कार्य कमी दर्जाचे नसते, वाचनाचे महत्व, सुसंस्कार, संस्कृती, देशभक्ती जागृत बीजे आम्हाला मिळाली तीच तुमच्या जीवनात उतरविण्याचा निश्चित प्रयत्न करा नक्कीच यश मिळायला अधिक वेळ लागणार नाही. आणि देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही*
__________
भाषण – 4
*श्री मोहनकुमार हंचाटे, बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी*
– शिक्षण क्षेत्रामध्ये विविध बदल ओळखून शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आज आहे; ते शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शिक्षणातील दर्जा उंचावण्याकरिता शिक्षकांनी पावले उचलायला हवी. वेळोवेळी शैक्षणिक दर्जा आणि गुणात्मक शिक्षण देण्यासाठी शिक्षक पालक आणि समाज आणि अतिशय जाणीवपूर्वक कार्य करून देशांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्राथमिक माध्यमिक शाळा मधून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जावे.