बीजगर्णी,कावळेवाडी,राकसकोप महालक्ष्मी यात्रेला जल्लोषात सुरुवात झालेली आहे. मंगळवारी सकाळी देवीची विधी व पूजा आजच्या पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली.आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
तब्बल तीस वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या या महालक्ष्मीच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे. आज देवीचा रथोत्सव पार पाडण्यात आला. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत उदो ग उदो आईचा गजर करत पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहाला सुरुवात झाली.
आज सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होणार असून त्यानंतर देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे सलग नऊ दिवस ही यात्रा होणार असून यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
यात्रेकरिता भावीकांची सोय व्हावी याकरिता परिवहन मंडळांनी गावामध्ये जादा बसेस सोडले आहेत. तसेच मंगळवारपासून मध्यवर्ती बस स्थानकात विशेष बस सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.