बेळगाव :तालुक्यातील जय भीम युवक कंग्राळी बीके यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद चे महांतेश तळवार ,ग्रामपंचायत सदस्य राजकट्टी, रेखा इंडीकर,अनिल पावशे ,नवनाथ पुजारी, जय भीम युवक संघाचे अध्यक्ष नेमानी कांबळे, संजय कंग्राळकर,दुर्गप्पा कांबळे, माजी तालुका पंचायत सदस्य प्रेमा कंग्राळकर, आकाश मैल्लांनावर, हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर गल्लीतील लहान मुलांनी बाबासाहेब जीवनावर आधारित नाटकाचे सादरीकरण केले. यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गल्लीच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.