बेळगावच्या चार विद्यार्थ्यांची इनलाइन फ्री स्टाईल स्केटिंग स्पर्धत निवड झाली आहे हे सर्व विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून सदर स्पर्धा साउथ कोरियामध्ये पार पडणार आहे.
दिनांक 18 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान साऊथ कोरियेमध्ये पार पडणार या स्पर्धेमध्ये बेळगावचे विद्यार्थी आपला ठसा उमटवणार आहेत. देवेन बामणे , जयध्यान राज, वीरेन राज, आणि रश्मिका अंबिगा हे चार विद्यार्थी साउथ कोरे मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विशेष म्हणजे हे चारही विद्यार्थी बेळगावचे रहिवासी असून बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी चे स्केटिंग पटू आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच साउथ कोरियामध्ये होणाऱ्या स्पर्धेकरिता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
आशिया खंडातील 13 देश या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. त्यामुळे या चौघांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि मंजुनाथ मंडोळकर यांचे विशेष सहकार्य या विद्यार्थ्यांना लाभत आहे. तसेच इनलाइन हॉकी या स्पर्धेमध्ये यशपाल पुरोहित आणि मंजुनाथ मंडोळकर यांची देखील निवड करण्यात आली आहे आणि हे दोघे देखील साऊथ कोरिया मध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत.