बेळगाव शहर आणि परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली.गेल्या काही दिवसापासून वातावरणातील उष्म्यात वाढ झाली होती.जनता उकाड्याने त्रस्त झाली होती.वळीव पावसामुळे लोकांना सुखद गारव्याची अनुभूती मिळाली.उष्मा वाढलेला असताना अचानक ढगांचा गडगडाट आणि जोरदार वारा सुरू झाला.
आकाश अंधारून आले आणि पावसाला सुरुवात झाली.गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या तापमानामुळे जनता हैराण झाली होती.दुपारच्या वेळी तर उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होत होते.उकाड्यामुळे उसाचा रस आणि शीतपेयांची मागणी वाढली होती.काही काळ झालेल्या वळीव पावसामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला.