मुतगे येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 21 एप्रिल रोजी निकाली कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडा भरवण्यासंदर्भात मारुती मंदिरात हनुमान कुस्ती संघटनेची बैठक घेण्यात आली .
गतवर्षीचा अहवाल आणि जमाखर्च सादर करून मैदान नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महारष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारतातील नामवंत मल्लाना निमत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पै.भावकाना पाटील, श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, जोतिबा केदार, जयसिंग पाटील, तुकाराम पाटील, सातेरी पाटील, नामदेव पाटील, कृष्णा शिंदोळकर, सिद्दाप्पा पाटील, सयाजी पाटील , भैय्याजी पाटील, भरमानी सनदी, सुधीर पाटील, बाबू खोंपी यांच्यासह कुस्ती कमिटीचे सदस्य, गावकरी उपस्थित होते. पै. नवीन पाटील यांनी आखाडा नियोजनाबाबत माहिती देवून आभार मानले.