खानापूर : बेकवाडमधील (ता. खानापूर) युवकाचा खानापूरजवळील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी उघडकीस आली. प्रवीण मारुती पाटील (वय ३०) असे त्याचे नाव आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तो बेपत्ता होता. गुरुवारी दुपारी मलप्रभा नदी घाटाजवळील पुलापासून काही अंतरावर पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात
आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. युवकाच्या खिशातील ओळखपत्रावरुन मिळाला. त्याचा पत्ता
पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता तो युवक बेकवाडचा असल्याचे स्पष्ट झाले. नदीपात्रात पाय धुण्यासाठी उतरला असताना तोल जाऊन पडल्याने त्याचा आकस्मिक बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.