बेळगांव:तालुक्यातील राजा श्री छत्रपती शिवस्मारक सेवा संघ आंबेवाडी नियोजित महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 21 जुलै रोजी आंबेवाडी येथील मराठी शाळेसमोर करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला म.ए.समितीचे युवानेते श्री आर.एम.चौगुले व आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी यळगुकर यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव अतिवाडकर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन उद्योजक बाळासाहेब धामणेकर,हरीशभाई पटेल,सी.एम पाटील,मंजुनाथ गरज,सुरज निलजकर,एम.एस. नवलगट्टी, यांच्या हस्ते करण्यात आले.
काँक्रीट मशीन पूजन प्रकाश म्हात्रू ढोपे,सुनील धाकलू राक्षे, अनंत तुडेकर, यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त प्राचार्य भाऊराव निळू कातकर त्याचबरोबर गावातील सर्व स्तरातील मान्यवर मंडळी व युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.