खानापूर इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ.सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मेकअप प्रशिक्षण, ब्लाउज शिलाई आणि केक बनवण्याच्या पाच दिवसांच्या कार्यशाळेनंतर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या.
यावेळी डॉ सोनाली सरनोबत यांनी महिलांच्या जबाबदारी वर मनोगत व्यक्त केले आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
या प्रशिक्षण शिबिराचा फायदा अनेक महिलांना झाला .क्लबच्या अध्यक्षा सौ.शिल्पा अध्याताई कल्याणी, सौ.जोरापूर, सौ.कदम, मेघा कुंदरगी (टाउन कौन्सिलर सदस्य) व इतर कार्यालयीन सदस्य उपस्थित होते.