सुवर्ण विधानसौध येथे येत्या 4 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाकरिता येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची प्रमुख मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासाची सोय विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठासह शासकीय व खाजगी विश्रामगृहामध्ये करण्यात आले आहे.
तर आमदार करिता आणि अधिकाऱ्यांसाठी बेळगाव शहर परिसरातील 75 हॉटेल्स मधील एकूण 2009 खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जरी असे असले तरी या अधिवेशनाबाबतची अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेला नाही.
प्रथमतः अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला की सर्वात आधी निवास व्यवस्थित नियोजन केले जाते. याची जबाबदारी महापालिका प्रशासनाला असते मात्र बेळगाव महापालिकेला निवास व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली नाही महापालिकेला देखील शहरातील हॉटेल मालकांची बैठक घेऊन अधिवेशनाबाबत त्यांना सूचित केले आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हॉटेलची रंगरंग होते अंतर्गत स्वच्छता तसेच रंग रांगोटी चे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.