This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी काँग्रेसला विजयापर्यंत पोहोचवणार का?*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय जनता पार्टीने रविवारी रात्री कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी जाहीर केली. इतर जिल्ह्यातील उमेदवार लादल्याने स्थानिक भाजप नेते नाराज आहेत. या नाराजीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना होईल असे वर वर वाटत असले तरी जगदीश शेट्टर यांनी राज्याची धुरा सांभाळलेली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूशीत तयार झालेला एक मातब्बर आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणती खेळी खेळली जाईल यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे जगदीश शेट्टर व काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. या दोन्ही मातब्बर नेत्यांमध्ये लढत होणार असली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती कोणता निर्णय घेते यावर मतांचे गणित अवलंबून आहे. समितीने चाचपणी सुरू केली असून लवकरच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. समितीतील एक गट निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे तर दुसरा गट सावध भूमिकेत आहे.

बेळगाव मतदारसंघात काँग्रेसने महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या चिरंजीवाला उमेदवारी दिली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दणदणीत विजयामध्ये मृणाल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील तरुणांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळेच देशात काँग्रेस विरोधी वातावरण असतानाही बेळगाव मध्ये मात्र युवा वर्ग काँग्रेस सोबत जोडला जात असल्याचे एकूणच दिसून येत आहे.

भाजपमधील स्थानिक नेत्यांची नाराजी काँग्रेसला विजयापर्यंत पोहोचवेल असा निष्कर्ष काढला जात असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात हेब्बाळकर यांचे राजकीय वजन वाढू नये यासाठी सर्व परीने प्रयत्न सुरू आहेत. जारकीहोळी व हेब्बाळकर यांच्यातील शीतयुद्ध बेळगावकरांना काही नवीन नाही. यापूर्वीही अनेक वेळा याची प्रचिती आली आहे. हेब्बाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये असा थेट इशाराच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला होता. स्वतः मंत्री, भाऊ विधान परिषद सदस्य व आता मुलगा खासदार झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हेब्बाळकर यांचे राजकीय वजन आपोआपच वाढले जाणार आहे. त्यामुळे त्यांचा विजयी रथ रोखण्यासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय सोपा वाटतं असला तरी तो सहजासहजी मिळणार नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now