This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*बेळगाव आणि चिकोडी लोकसभेची उमेदवारी कोणाला*

*बेळगाव आणि चिकोडी लोकसभेची उमेदवारी कोणाला*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव आणि चिकोडी लोकसभेची उमेदवारी कोणाला

काँग्रेस भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री यमकनमर्डीचे आमदार तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते असे प्रश्न विचारले असता त्यांनी यावर उत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षाकडून बेळगाव मध्ये लिंगायत आणि चिकोडीतून धनगर समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देण्याबाबतचा विचार सुरू आहे असे सांगितले. मात्र लोकसभेचे उमेदवार कोण असतील यावर अजून निर्णय झालेला नाही पक्षाची बैठक घेऊन त्यावर निर्णय होणार आहे असे यावेळी सांगितले .

तसेच ते पुढे म्हणाले की समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या तसेच जनतेच्या सतत संपर्कात राहणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबतचा गांभीर्याने विचार करत आहे. त्याचबरोबर माजी आमदार पुन्हा विश्वासात घेऊन हाय कमांडच्या ग्रीन सिग्नल वर उमेदवार ठरवला जाईल असे यावेळी सांगितले.

तसेच ते पत्रकारांनी विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की राज्यात भाजपचे नेते विरोधी पक्षात आहेत आणि विरोधी पक्षाचे काम आरोप करणे आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो एकमेकांवर आरोप हे करतच असतात मात्र लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे त्यांना चांगलेच माहित आहे.

भाजपचे नेते बिनबुडाचे आरोप करत आहेत. आमच्या सरकारच्या गॅरेंटी योजनेवर आम्हाला विश्वास आहे आणि जनतेला विश्वास आहे. फक्त भाजप पक्षालाच यावरती आक्षेप आहे असे यावेळी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24