वीर ज्योतीचे बेळगावात स्वागत
कित्तूर उत्सवाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वीर ज्योतीचे बेळगावात स्वागत करण्यात आले.
कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्नाटक राज्यात वीर ज्योत फिरणार आहे.
बेळगाव येथे वीर ज्योतीचे आगमन झाल्यावर आमदार राजू सेठ यांनी ज्योतीचे पूजन केले.नंतर मान्यवरांनी विर राणी कित्तुर चन्नमाच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.त्या नंतर शहरातील प्रमुख मार्गावर वीर ज्योत फिरवण्यात आली .यावेळी कला पथके देखील वीर ज्योतीच्या मिरवणुकीत सहभागी झाली होती.नंतर वीर राणी कित्तूर चन्नमाचे माहेर असलेल्या काकती गावाकडे वीर ज्योत रवाना झाली.