बेळगांव:दिनांक 24 2024 बेळगाव मी माजी महापौर विजय मोरे सर्व जनतेंना विनंती करू इच्छितो की उन्हाळा भरपूर असल्यामुळे पक्षांना पाणी मिळत नाही आहे त्यामुळे बेळगाव शहरांमध्ये आपापल्या टेरेस वरती कुठे जागा असेल त्या ठिकाणी छोटे छोटे भांड्यामध्ये पाणी रोज ठेवून पक्षांना पाणी मिळेल अशा पद्धतीने व्यवस्था करावा आणि सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मी विनंती करतो.
की आपापल्या शेतामध्ये प्राणी असो जनावर असो या सर्वांना पाणी मिळण्याची व्यवस्था करावी फक्त दोन महिने हे व्यवस्था केल्यामुळे कित्येक प्राण्यांचा पक्षांचा जीव वाचला जाईल त्यासाठी परत एकदा मी सर्व बेळगाव वाशी यांना मी विनंती करू इच्छितो की हा प्रयोग करून कित्येक प्राण्यांचा पक्षांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मिळून हा उपक्रम राबविला धन्यवाद