This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*”पाणलोट प्रकल्प”पाहण्यासाठी आर एफ ओ अधिकाऱ्यांना दिली भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामहट्टी या गावाजवळील आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात गर्द हिरवाई सोबत तेथे असणाऱ्या बंधाऱ्यात, तलावांत व विहिरीत पाण्याच्या साठा आजच्या काळात दिसत आहे त्याचे श्रेय बेळगांवचे जेष्ठ समाजसेवक व पर्यावरण तज्ञ डाॕ. शिवाजी कागणीकर यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. शिवाजी दादांनी आपल्या बेळगांव तालुक्याच्या उत्तरेकडील परिसरात केलेला “पाणलोट प्रकल्प” पाहण्यासाठी धारवाडच्या वाल्मी संस्थेमार्फत अरूणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ व तामिळनाडू येथील जवळपास 30 आरएफओ प्रशिक्षणार्थी तसेच वाल्मी संस्थेचे संचालक व अधिकारी आले होते.

1995 पुर्वी बेळगांव तालुक्याच्या या उत्तरेकडील भागात प्रथमतः पाण्याचे खूप दुर्भिक्ष होते त्यामुळे येथील डोंगराळ परिसर ओसाड व भकास वाटत होता, परिणामी येथील भागातील शेतकऱ्यांचे शेतीमध्ये उत्पन्न कमी होते, चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना दुभती जनावरे पाळता येत नव्हती, म्हणून या गावांमध्ये लोक सोयरीक जोडण्यासाठी आपल्या मुली (लग्नास) देण्यासही धजावत नव्हते, पण शिवाजी दादांनी लोकसहभागातून 2000 सालानंतर केलेल्या या पाणलोट प्रकल्पाच्या प्रयोगानंतर येथील परिस्थिती बदलली, या (पाणी अडवा – पाणी जिरवा – फळझाडे लावा) मोहिमेनंतर जमिनीत पाण्याचा मुबलक साठा झाला, शेतीसाठी, जनावारांना चारा व पिण्यासाठी पाणी कायम उपलब्ध झाले.

शिवाजी दादांनी हा पाणलोट प्रकल्प करताना सरकारी मदतीची अपेक्षा न करता लोकसहभातून बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामहट्टी या गावपरीसरातील डोंगराच्या उतारावर चरी खणून घेतल्या त्याशेजारी स्थानिक भागात फळणाऱ्या फळझाडांची लागवड केली जेणेकरून भविष्यात फळझाडांचे उत्पन्न गावकऱ्यांना मिळेल, बंबरगा गावालगत दोन डोंगरांच्या मधील भागाचा योग्य उपयोग करून लोकसहभातून बंधारा बांधवला, ज्यामूळे खालील गावभागातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे, कट्टनभावी गावात दोन तलाव व विहिरी खोदल्या तेथेही जमिनीत पाणी मुरल्याने तलावाशेजारील विहिरीत फक्त आठ फुटावर पाणी कायम उपलब्ध दिसेल, गोरामहट्टी व निंगेनहट्टी भागातसुद्धा दोन-दोन तलाव व विहीरी तयार केल्याने त्या गावातही पाण्याचे दुर्भिक्ष संपले आहे.

डाॕ. शिवाजी दादांनी केलेला हा आपला बेळगांवचा वाॕटरशेड मॕनेजमेंट प्रोजेक्ट पाहण्यासाठी आलेल्या सर्वांचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी शब्दसुमनांने स्वागत केले, शिवाजी दादांनी अगदी तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहाने आलेल्या सर्व पाहुण्यांना लावलेली झाडे, बंधारा, तलाव, विहिरी व गोबरगॕस प्लँटचा परिसर फिरून दाखविला, यावेळी वाल्मी संस्थेचे सुपरीटेंट इंजिनियर, प्राध्यापक भिमा नाईक, सहाय्यक प्राध्यापक इंदुदर हिरेमठ, डिआरएफओ शंभू पुजार, सहाय्यक ट्रेनर फकिरेश अगडी व चार राज्यातील आरएफओ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24