श्री विश्वकर्मा मनुमय संघ, अनगोळ यांच्यावतीने गुरुबार दि. २२ रोजी श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी यामध्ये आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन केले आहे.
लोहार गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या मंदिरामध्ये गुरुवार दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण, सकाळी ९ वाजता अभिषेक व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी गुरुदत्त सेवा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, महिलांसाठी नी हळदी-कुंकू कार्यक्रम होईल. दर त्यानंतर पुन्हा रात्री श्रीराम भजनी बचे मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.