बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोक जोशी (वय 72) यांचे बुधवारी पहाटे आजाराने निधन झाले.अशोक जोशी सध्या निवृत्त जीवन जगत होते. संयुक्त कर्नाटक, हसीर क्रांती आदी वृत्तपत्रामध्ये त्यांनी काम केले.
विविध अवयव निकामी झाल्याने गेल्या आठवडाभरापासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.बुधवारी दुपारी 1 वाजता रुद्रभूमी, चिदंबरनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. साईसृष्टी अपार्टमेंट, व्हॅक्सिन डेपो येथून अंत्ययात्रा निघणार आहे.