This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विविध सामाजिक संस्थांच्यातर्फे मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक व कार्यकर्त्यांचा सत्कार आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*विविध सामाजिक संस्थांच्यातर्फे मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक व कार्यकर्त्यांचा सत्कार आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन

बेळगांव तारीख 03 ऑक्टोंबर 2023 : आजचा तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तरुणांनी व्यसनापासून दुर राहून निरोगी राहिले पाहिजे. व राष्ट्राचा कणा मजबूत ठेवला पाहिजे. समाजसेवा करणारे योद्धा ग्रूप प्रत्येक गावात घरोघरी निर्माण व्हायला हवेत; थोर समासुधारकांचा वसा जपण्यासाठी तरुण पिढीने आज सज्ज झाले पाहिजेत. नव्या पिढीमध्ये जागृती करण्यासाठी नवे क्रियाशील उपक्रम राबविले गेले पाहिजेत. बेळगाव मध्ये अनेक वर्षे सामाजिक कार्य करणारे कै. निगाप्पांना भेकने यांचे जीवनकार्य अतिशय प्रेरणा देणारे आहे त्यांचे कार्य समाजाला एकवटून परिवर्तन करण्याची क्षमता त्यांच्यात होती. कोणत्याच प्रकारचे भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक देऊन वेळोवेळी प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. गरीब-श्रीमंत, उच्च- निच्च, जात, धर्म, पंथ, भाषा , लहान- मोठा असा कोणताच भेदभाव न करता सामावून घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा अहोरात्र ते प्रयत्न करीत होते. अतिशय संघर्षातून त्यांनी प्रवास करत बहुजन समाचाचे दुःख पुसण्याचे काम केले आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सर्वसामान्यांच्या हांक्कासाठी वेळोवेळी क्षणाक्षणाला मदत करत सामाजिक बांधिलकी जपणारे वेक्तीमत्व ; त्यांचे कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतील. आमच्यासारख्या नव्या युवकांना त्यांच्या सानिध्यात राहून राजकारण समाजकारण शिक्षण आरोग्य सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करण्याची क्षमता नव्या समाजसेवकांमध्ये निर्माण केले. कुलदीप, बाबासाहेब आणि त्यांचे भेकणे कुटुंबीय यांनी खरोखर समाजसेवेचा अविरत वारसा सदोदित आजही चालवत आहेत सार्थ अभिमान प्रत्येकाला वाटायला हवा. सर्व सामान्यांच्या पासून ते शेतकऱ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत, दिन दलित कष्टकरी गोरगरीब शोषित वंचित जनतेच्या कल्याणासाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य केले आहे. आपल्या व्यवसायाला सांभाळून जिद्दी चिकाटी आणि कष्ट अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून अजिबात न चुकता सातत्याने त्यांनी समाजाची सेवा केली हीच प्रेरणा समाजाला दिशा देणारी ठरेल असेच कार्य येणाऱ्या प्रत्येक घटकातील पिढीने घ्यावे असे त्यांचे कार्य सदोदित चिरकाल स्मरणात राहील हीच दृष्टी आपण सगळेजण घेऊन जाऊया आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यांचाच वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी तीच परंपरा चालू ठेवून समाजामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविलेला आहे. *असे प्रतिपादन समाजसेवक आणि माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी “” कै. निंगाप्पा भेकणे यांचे जीवन कार्य आणि सामाजिक चळवळ एक चिंतन””* या विषयावरती आयोजन करण्यात आले होते.

वडगाव शहापूर अनगोळ खासबाग बेळगाव येथील लघुउद्योग व्यवसाय सामाजिक संघटना, शेतकरी ग्रामस्थ आणि कैलासवासी समाजसेवक निंगाप्पाण्णा भेकणे सामाजिक संस्थेतर्फे मार्कंडेय साखर कारखाना काकती बेळगाव येथील नूतन संचालक व कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आणि विशेष व्याख्यान *समाजसेवक माजी नगरसेवक अनिल पाटील यांचे “” कै. निंगाप्पा भेकणे यांचे जीवन कार्य आणि सामाजिक चळवळ एक चिंतन””* या विषयावरती विशेष व्याख्यानाचे आयोजन वडगाव येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवाडी येथील पंच समाजसेवक नारायण शट्टूप्पा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आणि कार्यक्रमाची सुरुवात केली.

व्यासपीठावर मार्कंडेय साखर कारखाना येथील नूतन संचालक आणि कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बिगरशेती विभागातून मोठ्या फरकाने गंगाधर शानभाग यांचा पराभव करत आलेले नूतन संचालक बाबासाहेब भेकने, प्रमुख वक्ते म्हणून माजी नगरसेवक श्री अनिल पाटील, भाग्यलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक कुलदीप भेकणे , सूर्यकांत शिवनगेकर, प्रा निलेश शिंदे, संतोष शिवनगेकर, मोहन बेनके, विलास टक्केकर, मोहन काजवे, मधु संभाजी , इंदू निंगाप्पा भेकणे, नारायण सांगावकर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फोटो पूजन करण्यात आले; या वरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्वागत लक्ष्मी भेकणे यांनी केले. प्रस्ताविक संतोष शिवणगेकर यांनी केले. परिचय गोपाळ अण्णाप्पा संभाजी व जोतिबा धामणेकर यांनी परिचय करून देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी विषय सविस्तर संपूर्ण सामाजिक चळवळ आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.

सूत्रसंचालन प्रा. निलेश शिंदे यांनी केले. मंजुषा भेकणे यांनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत धामनेकर, रूपा धामणेकर, सुनील सरनोबत , प्रभाकर पाटील, शुभम होसुरकर, सोमराज भेकणे, मंजुनाथ देसाई, शिवराज भेकणे, वामन किल्लेकर, श्रीहरी भेकणे, प्रभाकर डेळेकर, नितीन खंणूकर, विक्रम होसुरकर कृष्णा धामणेकर यासह विविध संघटनाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी रसिक चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now