किल्ला येथील बद्रोद्दीन आरिफ चिस्ती यांचा 21 पासून उरूस
बेळगाव किल्ला येथील हजरत सय्यदीना शेख बद्रोद्दीन आरिफ चिस्ती यांचा 797 वा उरूस रविवार 21 जानेवारी पासून होणार आहे.या निमित्ताने किल्ला येथील बद्रोद्दीन आरिफ चिस्ती बाबांच्या दर्ग्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 21 जानेवारी रोजी कुराण पठण,सोमवार 22 जानेवारी संदल कार्यक्रम होणार आहे.सोमवारी बागवान गल्लीतून सायंकाळी 6 वाजता संदल निघणार आहे. मंगळवारी 23 जानेवरी रोजी दुपारी किल्ला येथें उरूस होणार आहे या शिवाय 23 जानेवारी रोजीच दिल्ली येथील कव्वाली नजीर कादरी यांचा कार्यक्रम तर बुधवार 24 जानेवारी रोजी महफील समा कार्यक्रम होणार आहे.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून किल्ला येथील दरगाह ओळखला जातो या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रफिक मुजावर यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी 7090577865