This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नगर विकास मंत्री सतीश जरकिहोळी येळ्ळूर वासियांची घेतली भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर विकास मंत्री सतीश जरकिहोळी येळ्ळूर वासियांची घेतली भेट

दिनांक 7 जून 2023 रोजी नूतन जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना गायरान जागा, जलजीवन मिशन योजना आणि केइबी संदर्भात तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामा मधे याकडेही लक्ष घालुन विकासकामांना चालना देण्याच्या संदर्भात येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले..
येळ्ळूर सर्वे नंबर 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे.

एका दृष्टीने विचार केल्यास येळ्ळूर गावामध्ये 25000 लोकसंख्या आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे येळ्ळूर गावाला लाभलेली ही 49 एकर 13 गुंठे जागेपैकी 40 एक्कर गायरानाची जागा जर आंतरराष्ट्रीय क्रीडांगणासाठी गेली तर याचा फटका संपूर्ण शेतकरी वर्गाला बसणार असून भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ग्रामपंचायतीच्या नवीन उपाययोजना आणि स्कीम्सची पूर्तता करण्यासाठी आमच्या गावाकडे जागाच शिल्लक राहणार नाही..त्याचबरोबर जनावरे चारण्यासाठी गायरान अतिशय महत्त्वाचे आहे.

.येळ्ळूर मधून रिंग रोड करण्याचा घाट तर सरकारने घातलाच आहे आणि त्यात भर म्हणून हे आंतरराष्ट्रीय क्रीडांगण. याने विकासाच्या नावाखाली गावातील पिकाऊ जमीन व गायरान नष्ट होणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत काही घरे, गावातली हरी मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र, गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य टाक्या यांचा समावेश असल्याने या सर्व गोष्टी सुध्दा गावाला गमवाव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव करून याला विरोध देखील केला होता. पण यावर कोणतीच भूमिका घेतली गेली नाही…

  1. तसेच येळ्ळूर गावासाठी सरकार मार्फत राबविण्यात आलेली जलजीवन मिशन योजना गेली दोन वर्ष हे काम सुरू असून जवळ जवळ 5 कोटीची ही जलजीवन मिशन योजना सबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि मनमानी मुळे अयशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन घालणे, नळाची जोडणी करताना कोणतेच नियोजन नसणे, फिल्डर प्लांटमध्ये पाण्याचा शुद्धीकरण योग्य प्रकारे न होणे पाण्याच्या टाकीचे वॉटर प्रूफिंग योग्य प्रकारे नसणे, गावामधे एकूण 7 झोन आहेत एखाद्या झोन मधे जर 200 नळ कनेक्शन असतील तर त्यातील फक्त 50% नळांना पाणी येणे, ठिकाणी पाण्याचे प्रेशर कमी असणे काही ठिकाणी पाईपला गळती असणे, तर काही ठिकाणी पाइपलाइन गटारीवर बसवल्या आहेत. तसेच अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी पाईप लाईन जोडणीचे काम पूर्णच झालेले नाही, या पार्श्वभूमीवर
    आणि वीजपुरवठा (केइबी ) संदर्भातही निवेदन सादर करण्यात आले. यामधे वीजपुरवठा संदर्भात ज्या समस्या आहेत, जसे की जीर्ण झालेले पोल त्याठिकाणी नविन पोल बसविणे, काही ठिकाणच्या टीसी खराब झाले आहेत तर त्याची दखल घेऊन त्यासंदर्भात दुरुस्तीचे काम, काही ठिकाणी घरावरून विद्युत तारा गेलेल्या आहेत याने जीवित हानी होऊ शकते तर याची दखल घेऊन या संदर्भात उचलण्यासाठी सबंधित अधिकाऱ्याना वारंवार ग्रामपंचायत मार्फत निवेदन देऊन देखील यावर दुर्लक्ष करण्यात आले आहे.. तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामा मधे याकडेही लक्ष घालुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

त्यामुळे सर्व समस्यांचा सारासार विचार करून येळ्ळूर मधील आंतरराष्ट्रीय स्टेडियम दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे तसेच जलजीवन मिशन योजना आणि विद्युत पुरवठा संदर्भात ज्या काही समस्या आहेत तसेच गावातून रस्ते गटारी आणि इतर विकास कामे त्यामध्ये जातीने लक्ष घालून या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सहकार्य करावे असे येळ्ळूर ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले यावेळी आपण स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढू असे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
हे निवेदन सादर करतेवेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, ज्योतिबा चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनुसया परीट, रूपा पुण्ण्यानावर, मनीषा घाडी, राजू डोण्ण्यान्नवर, सोनाली येळ्ळूरकर , लक्ष्मण छत्र्याण्णावर आणि गावातली नागरीक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now