This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या 5 जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू*

*तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या 5 जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या 5 जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

तिरुपती येथे दर्शनाला गेलेल्या बेळगाव जिल्ह्यातील पाच जण आंध्रप्रदेश मधील मथपल्ली येथे झालेल्या अपघातात ठार झाल्याची दुर्दैवी घटना पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. क्रूझर वाहनाने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला.

बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.क्रुझर वाहनातून सोळा जण तिरुपतीला गेले होते.अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत.बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील सोळा जण तिरुपतीला गेले होते.अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना कळवले.

पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रुझर वाहनातील जखमींना बाहेर काढून तिरुपती येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.अपघातात ठार झालेल्या पाच जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.हनुमंत अजुर (५२), मनंदा अजुर (४६), शोभा अजुर (३६),अंबिका अजुर (१९) आणि हणमंत जाधव (५२) अशी मृतांची नावे आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24