बेळगावात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने दोन गटात हाणामारी झाली असून दगडफेक करण्यात आली. बेळगाव शहरातील शहापूर आळवण गल्ली येथे ही घटना घडली.
या घटनेत दोघेजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आयुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर आळवण गल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बाबत शहापूर पोलिस अधिक तपास करत आहेत