बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.एच.जे.मोळेराखी यांच्या सानिध्यात पार पडला.यावेळी प्रमुख वक्ता म्हणून हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. डी.एम. मुल्ला हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एन.एस. एस.अधिकारी प्रा. राजू हट्टी यांनी कार्यक्रमा विषयी प्रस्तावना मांडून उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे कर्मचारी लक्ष्मण गोडसे यांच्या हस्ते गांधीचे फोटो पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. डी. एम. मुल्ला म्हणाले की, आज जग विकासाबरोबरच अराजकते कडे सुद्धा जात आहे. आज जगाला गांधी विचार दर्शनाची फार आवश्यकता आहे. गांधींच्या सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभावना आणि शांती तत्त्वाला अंगीकार करणे गरजेचे आहे. गांधींनी सत्य आणि अहिंसा च्या माध्यमातून बंदूकधारी ब्रिटीश अराजकतेला संपून देशाला स्वतंत्र मिळवून दिले. गांधी हे युगपुरुष होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एच.जे.मोळेराखी म्हणाले की गांधी विचारधारा भारतीय संस्कृतीला जगामध्ये स्थापित करते. गांधींच्या सत्य आणि न्याय निष्टे मुळेच आज मनुष्य प्रामाणिकपणे जीवन जगतो.गांधीमुळेच आज जागतिक स्तरावर भारत महान राष्ट्र म्हणून गणला जातो.
कार्यक्रमाच्या शेवटी एन.सी.सी. अधिकारी डॉ.शिल्पा मुदकप्पगोळ यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.