This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पुरोगामी विचारवंतांच्या विचारधारेची आज देशाला अत्यंत गरज आहे: ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

*पुरोगामी विचारवंतांच्या विचारधारेची आज देशाला अत्यंत गरज आहे: ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे*

*4 अ. भा. मराठी साहित्य संमेलन चार सत्रात यशस्वी*

बेळगाव, ता. () साहित्य संमेलन ही उपासना म्हणून बेळगांवमध्ये जिव्हाळ्याने जोपासतात. हेच बेळगावकरांनी मराठी भाषा टाकविली, सांस्कृतीक परंपरा, लोकपरंपरा, सीमा वेगवेगळया असल्या तरी भौगोलकदृष्ट्या वेगळ्या असतात; तर भाषिक आणि भावनिक दृष्टया या एकच असते. बेळगाव हे साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि प्रोत्साहन देणारे शहर आणि सीमा भागामध्ये प्रयत्न करून जतन करण्यासाठी झटणारे हे बेळगाव शहर आणि साहित्याची मूळ वृद्धिंगत करत गेले आहे. साहित्य हे माणसाच्या जीवनात दिशा देणारे असले पाहीजेत; सहित साहित्य हे लोककल्यानासाठी माणूस केंद्रित असले पाहिजे. लोकसाहित्य हे मानव जातीला नवा आयाम देणारे आहे. मानवता धर्म लेखनातून उतरला गेला असले पाहिजेत. ए. के. रामानुजाचार्य दक्षिण भारतातील लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक त्यांनी आजच्या धावपळीच्या काळातील स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय जीवनातील बाईचे दुःख , विरह वेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न त्याच्या कथेतून सांगीतले आहे. भिंतीच्या आत स्वतःला खचलेला दाह मोकळे व्हायचे आहे. मोकळ्या भीती अन श्वास रीता करायचा आहे.
देशासह जगभरात माजलेला जातीयवाद, चंगळवाद, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार , जागतिकीकरण उदारीकरण बाजारीकरण, खाजगीकरण आणि व्यवस्था अगदी क्रूर झाली आणि जतिजातीत विभागला समाज अधोगतीला जात आहे. त्याच्यापासून रोखण्यासाठी साहित्यिकांनी लेखणी उचलून सुदृढ समाज निर्मितीसाठी उभा राहायला हवे. प्रगतशील लेखकांनी सतत जागरूक राहिले पाहिजे. आजच्या व्यवस्थेला योग्य वळणावर आणायचे असेल तर पुरोगामी विचारवंतांच्या विचारधारेची आज देशाला अत्यंत गरजेचे आहे. लोकसाहित्यातून स्त्रीच्या वेदना विरह वेदना माडल्या आहेत. साहित्यातून स्त्रीच्या हळूवार जीवनातील विविध रूपे ओव्या कवितेतून मांडले आहे. लोकांचे जीवन साहित्यातून मांडले. जगण्याच्या अनुभवांनी जोपासली आहे. अनेक कौशल्याचा वापर करत जीवन नंदनवन करण्याचा प्रयत्न लोककलेतून केला आहे.
अंनादाबाई जोशी यांनी टिळकांना पैसे दिले आहे आणि स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे आजही होणाऱ्या स्त्रियांच्या अत्याचारावर बोलले पाहिजे. जगण्यामधून जीवनाचे सारे लोकसाहित्यातून तत्वज्ञान मांडले. अंतरापर्यंत स्त्री नी मजल मारली आहे यासह अनेक क्षेत्रात स्त्रियांनी ठसा उमटविला आहे.. वाढती असुरक्षितता चिंतेची बाब बनली आहे. विसंगता निर्माण झाली आहे.
विचारांनी प्रगल्भ असणारी पूर्तता झाली नाही. माणसाला प्रगल्भ करणारी शक्ती प्राप्त झाली आहे. विवेक आणि विचार हे माणसाला मिळालेली देणगी आहे. निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. 1992 सिझी नी भाषण केले आहे ते म्हणतात जगभरतील अस्वस्था निर्माण झाली आहे. ती अवस्था पुन्हा निर्माण झाली आहे. माणूस विचारशील आहे विकासाची साधने आहेत. भ्रष्टाचार पोखरलेल्या समाज झाला आहे. पुरोगामी विचारांची आज भारताला अत्यंत गरजेचे आहे.
आंतरिक दृष्या सक्षीकरणासाठी यायचा हवे. शिक्षण स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे. विचारशील आणि विवेकशील आहोत. भावनाशील माणूस आहे. प्रनिजिवणापेक्षा वेगळया माणूस आहे. भ्रष्टाारात बरबटलेला आहे. चागल्या सर्व सामन्याचा बुलंद आवाज केला पाहिजे. वाचन संस्कृती आणि नव्या पिढीची वाचन संस्कृती कमी झाली आहे. शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था, पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे पार पाडायला हवी. समाजाला आणि मराठी भाषा सर्वांच्या पर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न केले आहे. आज इंग्रजीच्या विळख्यात सापडले आहेत ; ती दूर करण्यासाठी सर्वांनी शिक्षकांनी आणि पालकांनी वाचनाची गोडी लावायला हवे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोकजीवन समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
मानवी मूल्यांसाठी, मानवाच्या कल्याणासाठी कार्य केले केले पाहिजे; संत साहित्य हे माणसाच्या कल्याणासाठी असलेले साहित्य दीर्घ काळ टिकले आहे आणि यापुढेही टिकणार आहे. प्रतिभा साहित्य निर्माण करायला हवे. नव्या पिढीला प्रेरणादेण्यासाठी नव्यादमाचे साहित्यीक निर्माण करायला नवे जागरण जागृती अभियान राबविण्यात आले पाहिजे. मनुष्य हाच साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. असे *प्रतिपादन संमेलनाच्या अध्यक्षा पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिकां डॉ. अरुणा ढेरे* यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंगल कार्यालयामध्ये संमेलन पार पडले.

संमेलनाच्या अध्यक्षा पुणे येथील जेष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे होत्या.

प्रारंभी आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून संमेलनाची सुरुवात करण्यात आली.

मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी “हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासारखे वागने “” स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर केले.

प्रास्तविक डी बी पाटील यांनी केले. स्वागताध्यक्ष परिषदेचे अध्यक्ष ॲड सुधिर चव्हाण यांनी केले.

यावेळी व्यासपीठावरील
अप्पासाहेब गुरव , राज्याध्यक्ष रविंद्र पाटील , कथांकथनकर आपासाहेब खोत, आर एम. चौगुले, सुरेश घाडी, अतीवाडकर, डॉ नितिन राजगोळकर, चव्हाण, रमेश पाटील, प्रकाश मरगाळे, दिगंबर पवार, शिवराज पाटील, शिवाजीराव हांगिरगे कर, डॉ. माधुरी शानभाग, महादेव चौगुले, पुष्पा हुंद्रे, तुकाराम वेसणे, राजेंद्र मुतगेकर, चंद्रकांत गुंडकल, विश्वास घोरपडे, नागेश झांग्रूचे, प्रकाश शिरोळकर, शुभम शेळकेकर, डी.बी. पाटील, अरुणा गोजे पाटील, कवी अनिल दीक्षित , कवी रमजान मुल्ला, ॲड. सुधीर चव्हाण , कवी प्रा निलेश शिंदे, मधू पाटील, अस्मिता आळतेकर , शीतल पाटील, संभाजी यादव, मुक्ता पांडुरंग माळवे, महादेव मोरे आणि भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे यां सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

उद्घाटक भाषण अप्पासाहेब गुरव यांनी केले. यावेळी ते म्हणाले ; ग्रामीण भागात साहित्य संमेलनाचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. मराठी टिकविण्यासाठी नेहमीचं प्रयत्न करत आहेत.

प्रास्तविकात डी बी पाटील म्हणाले; सीमाभागात मराठी भाषा संस्कृती परंपरा अस्मिता टिकविण्यासाठी नेहमी प्रयत्न आम्ही करत आहोत. संमेलनात
रामदास पुठणे, श्रीराम पचींद्रे, संजय राऊत, श्रीपाल सबनीस अध्यक्ष म्हणुन लाभले आहे. आत्ता चौथा साहित्य संमेलन च्या अध्यक्षा पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे मार्गदर्शन करणार आहेत.बेळगाव हे संघर्ष भूमी आहे. साहित्य
आणासहेब किर्लोस्कर, बाबापडमंजी, शंकर रामाणी,
रा. भी गुंजिकर सिमाभातील साहित्यिकांचे मोठे योगदान दिले आहे.

सूत्रसंचालन साहित्यीक , शिक्षक रणजीत चौगुले आणि रोशनी हूंद्रे यांनी केले. तर सूरज कनबरकर यानी आभार मानले. यावेळी आप्पासाहेब गुरव, रणजीत चौगुले, एम.के. पाटील, डी.बी.पाटील, एम.वाय. घाडी, अरुणा गोजे पाटील, स्मिता चिंचणीकर रोशनी उंद्रे , गीता घाडी, प्रेमा मोरे, नेत्रा मेणसे, संजय मोरे , स्वप्निल जोगानी, प्रा. मनीषा, नाडगौडा, प्रा. निलेश शिंदे, स्मिता किल्लेकर, संजय गुरव, अरुणा गोजेपाटील, एल. पी. पाटील, संजय गौंडाडकर, मोहन अष्टेकर, डॉ. संजीवनी खंडागळे, स्मिता मेंडके, सविता वेसणे , धनश्री मुचंडी, दया शिंदे, गणेश दडीकर , महादेव चौगुले , संजय मोरे सीमा मुरकुटे, सुनिता बडबंजी यावेळी यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी पालक विद्यार्थी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24