मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सेवा केंद्राला आज प्रशासनाने नोटीस बजावली आहे आणि टाळे ठोकले आहेत. सदर सेवा केंद्र हे आठ दिवसांकरिता बंद ठेवण्याचे आदेश आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिले आहे.
गोवावेस सर्कल येथील कॉमन सेवा सेंटर मध्ये महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधीचा अर्ज आणि या योजनेबद्दल माहिती या केंद्रामध्ये देण्यात येत होती. त्यामुळे याचा पोटशुळ कन्नड संघटनांना झाल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या योजना बंद पाडाव्यात अशी तक्रार केली.
त्यानुसार हे सेवा केंद्र बंद करण्यात आले आहे. आठ दिवसां करिता या केंद्रांना टाळे ठोकण्यात आले असून कर्नाटक प्रशासन बेळगाव वासियांना या माध्यमातून डिवचण्याचा प्रकार करत आहे.