This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद.

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद.

 

बेळगाव तारीख 14 टिळकवाडी येथील वव्क्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने गोमटेश टिळकवाडी ब संघाचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या 3 धावांनी पराभव करीत हनुमान चषक पटकाविला.अंतिम सामन्यातील सामनावीर देवेंद्र कुडची,मालीकावीर उमेश बेळगुंदकर,उकुष्ट गोलंदाज श्रीहरी लाड, उकूष्ट फलंदाज

रवि पुनसगौडा सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ कॅम्प विभाग यांना देण्यात आला.पहिल्या सामन्यात टिळकवाडी अ संघाने शहापूर विभागचा 47 धावांनी पराभव केला.दुसऱ्या सामन्यात गोमटेश टिळकवाडी ब संघाने उत्तर विभागाचा 9 गड्यानी पराभव केला.

तिसऱ्या सामन्यात टिळकवाडी अ संघाने कॅम्प विभागाचा 33 धावांनी पराभव केला.

अंतिम लढतील प्रथम फलंदाजी करताना टिळकवाडी अ संघाने 8 षटकात सर्वबाद 53 धावा केल्या.प्रत्युउत्तरादाखल खेळताना गोमटेश टिळकवाडी ब संघाने 8 षटकात 4 बाद 50 धावा केल्या व सामना अवघ्या 3 धावांनी गमविला.स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती उत्तर कर्नाटकचे सहसचिव विश्वास पवार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर,पी,वंटगुंडी, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन ओ डोंणकरी,गोमटेश शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, अशोक अन्नीगेरी, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहारटिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच बी पाटील माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी,चंद्रकांत पाटील जयसिंग धनाजी,या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नागराज भगवंतण्णावर , नितीन नाईक प्रमोद जपे, प्रभाकर कंगराळकर, रामलिंग परीट, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगणाकर ,अश्विन पाटील, निखिल कदम ,देवेंद्र कुडची, व विविध विभागातील शिक्षक व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24