*तीन दिवसीय कायद्यातील परिवर्तनीय तंत्रज्ञान’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद*
लिंगराज कॉलेज बीव्ही बेल्लद कायदा महाविद्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या पत्रकार परिषदेत केएलई संस्थेच्या बी व्ही बेल्लद महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 24 25 आणि 26 रोजी डॉक्टर बी एस कोडकणी सभागृह जे एन एम सी कॉलेज येथे परिवर्तनीय तंत्रज्ञान या विषयावर तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ बी जयसिंह यांनी दिली.
यावेळी त्यांनी केएलई लॉ अकादमीच्या नेतृत्वाखाली आणि ग्लोबल अकादमी ऑफ लॉ टेक एज्युकेशन अँड रिसर्च च्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आल्या असल्याचे सांगितले.
तसेच ही आंतरराष्ट्रीय परिषद परिवर्तनशील तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली परिसंस्था शिकण्याची शिक्षित करण्याची आणि आकार देण्याचे आकार संधी दिली असे ते म्हणाले.
ही आंतरराष्ट्रीय परिषद शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून या परिषदेच्या अध्यक्षस्थानी धारवाड कर्नाटक उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती सीएम जोशी असणार असल्याची माहिती दिली.
तर 26 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता या कार्यक्रमाचा समारोप समारंभ होणार असून यावेळी श्रीलंकेचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सोहम पीएरिस हे प्रमुख पाहुणे असणारा सून कर्नाटक गुजरात आणि मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डॉक्टर विनीत कोठारी यांचे समारोपीय भाषण होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
याचबरोबर या परिषदेत भारत आणि विदेशातील 15 हून अधिक तज्ञ संसाधन व्यक्ती म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली यावेळी प्राध्यापिका डॉ. उमा हिरेमठ ज्योती हिरेमठ प्राध्यापिका सविता पट्टणशेट्टी प्राध्यापक श्रीनिवास पलकोंड प्राध्यापक एन एस अलपणावर सुप्रिया स्वामी डॉक्टर अश्विनी हिरेमठ राजश्री पाटील डॉक्टर रिचा राव यांच्यासह आदी उपस्थित होते