लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर पुणे बंगलोर महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे चेक पोस्ट उभारण्यात आले असून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून मगच त्यांना सोडले जात आहे.बेळगाव वेंगुर्ले मार्गावर देखील बाची येथे चेक पोस्ट उभारण्यात आला आहे.याशिवाय बोरगाव आदी ठिकाणी पस्तीस हून अधिक तपासणी नाके उभारण्यात आले आहेत या तपासणी नाक्यावर पोलीस आणि महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची रजिस्टर मध्ये नोंद केली जात आहे.
तपासणी नाक्यावर सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.तपासणी नाके उभारल्या नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी नाक्याना भेट देऊन तेथे सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.