https://www.facebook.com/share/r/Ve79Amyrbr9eMntW/?mibextid=O563ZM
बेळगावातील होलसेल भाजी मार्केटमध्ये रविवारी कोथिंबिरीला या वर्षीचा उच्चांकी दर मिळाला.कोथिंबिरीच्या शंभर पेंड्याना साडे तीन हजार रुपये इतका दर मिळाला.उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात पण यावर्षी उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्या भाजीपाल्यांचे दर वधारले.
गेल्या काही दिवसात मान्सून पूर्व पाऊस होत असल्याने भाजीपाला दर वाढला आहे.शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी कोथिंबीर चढ्या भावाने विकली गेली. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाकातून कोथिंबीर गायब झाली आहे.