This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रस्ते गटारी व्यवस्थित करून द्या यांनी केली मागणी

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रस्ते गटारी व्यवस्थित करून द्या यांनी केली मागणी

 

वडरवाडी येथे रस्ते आणि गटारीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे आपल्या वस्तीत रस्ते गटारी सुस्थितीत असावे .तसेच आपला परिसर स्वच्छ असावा याकरिता डॉक्टर आंबेडकर क्रांती युवा वेदिकेने वडरवासियांतर्फे निवेदन दिले आहे.त्यांनी सदर निवेदन महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांना दिले आहे.

 

वडरवाडी येथे गटारी आणि रस्ते नसल्याने नागरिकांच्या घरातील सांडपाणी घराच्या बाजूने वाहत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्या असून त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

त्यामुळे त्यांना डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.ही समस्या जाणून घेऊन डॉक्टर आंबेडकर क्रांती युवा वेदिकेने आज ही गोष्ट महापालिका आयुक्त डॉ रुद्रेश घाळी यांच्या निदर्शनास आणून दिली

 

तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी गटारी रस्ते बांधकाम करून विकास कामे राबवावीत अशी मागणी केली. यावेळी डॉक्टर आंबेडकर युवा क्रांती वेदिकेचे कार्यकर्ते उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24