आपत्कालीन निधी महापौरांनी वापरला कुठे यावरून आज पालिकेत गोंधळ माजला. महापौरांसाठी असलेल्या आपत्कालीन निधीचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप नगरसेवक मुजमील डोनी यांनी केला आणि महापौरानी त्याचा खुलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली यावेळी विरोधी आणि सत्ताधारी गटामध्ये जोरदार वादावादी होत महापालिकेचे सर्वसाधारण सभा तब्बल दीड ते दोन तास खोळंबली
आज महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी महापालिकेच्या महापौरांसाठी एक कोटी रुपये आणि उपमहापौरांसाठी 50 लाख रुपये इतका आपत्कालीन निधी राखीव ठेवला जातो. याचा वापर कुठे केला असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी केला.
आपत्कालीन परिस्थितीत या निधीचा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी केली तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी या निधीची तरतूद करण्यात आले होते असे यावेळी सांगण्यात आले त्यानुसार या निधीचा व्हिडिओ केला जात होता मात्र विद्यमान महापौर शोभा सोमनाथचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी समुदाय भवन कमान उभारणीसाठी या निधीचा वापर केला असल्याचा आरोप गटाचे नगरसेवक मुजमील दोन्ही नगरसेवक अजीम पटवेकर आदींनी केला .
तसेच महापौरांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली यावरून सत्ताधारी गट आणि विरोधी गटांमध्ये शाब्दिक वाद उडाला त्यामुळे सभागृहांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तेव्हा महापौर शोभा सोमनाचे यांनी आपल्याला निधी खर्च करण्याचा अधिकार असल्यामुळे तो निधी खर्च केला असल्याचे स्पष्ट केले. आणि आपत्कालीन कारणासाठी राखीव असलेल्या निधी आपण कमानीसाठी वापरला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी आपत्कालीन करण्यासाठी राखीव असलेला निधी कसा वापरू शकता? असा जाब विचारला त्यामुळे सभागृहात वादावादीला सुरुवात झाली आणि तब्बल दीड ते दोन तास सभागृहात गोंधळ माजला.