This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*झाला अपघात :लोकांनी केली लूट…..!!!*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

झाला अपघात लोकांनी केली लूट

शीतपेयांच्या बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक कणगला गावाजवळ उलटला.ट्रक उलटल्यावर तेथील परिसरातील लोकांनी शीतपेयांच्या बाटल्या पळवून नेल्या.रविवारी ही घटना पुणे बंगलोर महामार्गावर घडली.

कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणारा ट्रक अतिवेगामुळे
कणगला गावाजवळ उलटला.उलटलेल्या ट्रकमध्ये शीतपेये असल्याचे तेथील लोकांना कळताच त्यांनी ट्रकमधील शीतपेयांची अक्षरशः लूट केली.ही घटना अन्य लोकांना कळताच आपली दुचाकी वाहने घेऊन लोक तेथून शीतपेयांच्या बाटल्या पळवून नेण्यासाठी आले.

शाळकरी मुले,तरुण आणि वयोवृद्ध अशा सगळ्यांनी ट्रक मधील शीतपेयांची च्या बाटल्या पळवून नेल्या.अखेर पोलिसांना अपघात आणि शीतपेयांची लूट होत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लाठीमार करून लोकांना पांगवले.पण पोलीस येईपर्यंत लोकांनी लाखोंची शीतपेये लंपास केली होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now