बेळगाव महानगरपालिकेच्या दक्षिण विभागीय महसूल शाखा कार्यालयात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याने रात्री खिडकीच्या काचा फोडून आज प्रवेश केला. आणि कार्यालयातील चार लॅपटॉप महत्त्वाचे कागदपत्रे चोरी केली आहेत.
बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी अधिकारी पी एन लोकेशनची नियुक्ती झाली होती त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर पदभार स्वीकारल्यावर दोन दिवसातच महत्त्वाची कागदपत्रे आणि लॅपटॉप कार्यालयातून गेले आहेत. कागदपत्रांमध्ये मालमत्तेचे मालकीच्या दस्तऐवज,मालमत्ता मालकाची ओळखपत्र टॅक्स डिड बांधकाम परवानगी कागदपत्रे चोरी झाले आहेत.
या कागदपत्रामध्ये 26 वार्ड मधील रहिवाशांच्या नोंदी असलेले चार लॅपटॉप सुद्धा चोरी गेले आहेत रात्री उशिरा चोरट्याने खिडकी तोडून तिजोरी ठेवलेले चार लॅपटॉप चोरून पळ काढला. आज सकाळी कर्मचारी कार्यालयात आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.
कडक अधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर लॅपटॉप चोरीला गेल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.चोरीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस आणि श्वान पथक कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलविले यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. याप्रकरणी महानगरपालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.