बेळगांव:धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गाडी 70 ते 80 फूट फरफरट पलटी होत.रस्त्या शेजारी असलेल्या शेतात पडल्यामुळे एक महिला जागीच ठार झाल्याची घटना सांबरा गावाजवळ घडली आहे.
हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास घडला आहे. याबाबत मिळाले माहिती अशी की शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगाने बेळगावहून सांबराकडे कार क्रमांक टी एन 75 झेड 1686 निघाली होती यावेळी कारचालकाचे वळणावर नियंत्रण सुटले.
त्यामुळे कार रस्त्यावरून सुमारे 70 ते 80 फूट फरफट पलटी होऊन शेतात जाऊन पडली . या अपघातात गाडीतील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे या घटनेची नोंद मारीहाळ पोलीस ठाण्यास करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.